२०१९ची निवडणूक खुल्या वातावरणात, ‘न्युट्रल अंपायर’च्या देखरेखीखाली झाली?
१९९० साली दक्षिण आफ्रिकेचे वर्णद्वेषविरोधी क्रांतिकारक नेते नेल्सन मंडेला यांच्याशी झालेली माझी छोटीशी बातचीत मला आठवली. भारताबाबत तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडतं, असं मी मंडेलांना विचारलं होतं. ‘अर्थातच, गांधी आणि त्यांचा अहिंसक सत्याग्रहाचा संदेश. पण दर पाच वर्षांनी तुम्ही ज्या खुल्या आणि न्याय्य वातावरणात निवडणुका घेता, तेही मला आवडतं. जगाने भारतापासून शिकायला हवं,’ त्यांनी म्हटलं होतं........